काळेवाडी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉ. अक्षय गंगाराम माने आणि सौ. पूजा अक्षय माने यांना जनतेकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. गेल्या २० वर्षांतील सामाजिक, शैक्षणिक व जनहितकारी कार्यामुळे नागरिकांचा विश्वास आणि आशीर्वाद ‘आप’कडे वळताना दिसत आहे.

नागरिकांशी थेट संवाद, घराघरांत भेटी, तसेच स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका यामुळे डॉ. अक्षय माने व सौ. पूजा माने यांची मोहिम प्रभावी ठरत आहे. “विकास हा फक्त घोषणांचा नव्हे, तर कृतीचा विषय आहे,” असे सांगत त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की, सध्याच्या काळात शिक्षणाचा खर्च सातत्याने वाढत जात आहे हे लक्षात घेता, प्रभाग २२ मधील विद्यार्थ्यांसाठी पहिली ते बारावीपर्यंत इंग्लिश मीडियम शिक्षण मोफत देण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षिततेस प्राधान्य देत पारदर्शक व जबाबदार प्रशासन देण्याचा संकल्प त्यांनी मांडला.
जनतेच्या वाढत्या पाठिंब्यामुळे प्रभाग २२ मध्ये ‘आप’चे वारे जोरात वाहू लागले असून, यंदा परिवर्तनाची घंटा वाजते आहे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.






















Join Our Whatsapp Group