पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. प्रचार फेरी, पदयात्रेनंतर आता कॉर्नर सभांचा धडाका सुरु केला आहे. या कॉर्नर सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. दत्तवाडीतील आदर्श मित्र मंडळ येथे झालेल्या कॉर्नर सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांच्यासह जेष्ठ नेत्या उर्मिला काळभोर, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उर्मिला काळभोर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबरोबर आल्याने पॅनेलची ताकद वाढली आहे.

उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, मागील पाच वर्षात जनतेच्या साथीने प्रभागात केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहोत. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करणारी कमान उभारली. प्रभागात शंभर खाटांचे कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय सुरु केले. याचा प्रभागातील मध्यमवर्गीय, गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. कमी पैशांत दर्जेदार उपचार मिळत आहेत. प्रभागातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले. पदपथावर पेव्हिंग ब्लॉक बसविले. कै. मल्हारराव कुटे अध्यात्मिक व सांस्कृतीक भवन, समाजभूषण डॉ. नानासाहेब धर्मादारी उद्यानाची निर्मिती केली. भगवान गौतम बुद्ध विहार चौकाचे अनावरण, प्रभागात गॅस वाहिनीची फिटिंग करुन दिली. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्हा चारही उमेदवारांचा निर्धार असून जनतेच्या साथीने प्रभागाला आदर्श मॉडेल करणार आहे.
उमेदवार विशाल काळभोर म्हणाले, प्रभागातील विकास कामाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणारे नगरसेवक असावेत. महापालिका सभागृहात गेल्यावर कोणता अजेंडा डोळ्यासमोर ठेवून आपण काम करणार आहोत. याचे आराखडा पाहिजे. आमच्याकडे त्याचा आराखडा आहे. त्यामुळे कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
Tags: Pramod kute






















Join Our Whatsapp Group