पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विकासकामांचा ठोस ट्रॅक रेकॉर्ड आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळे भाजप उमेदवारांकडे नागरिक पाहत आहेत.

भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक १० मधून एक बिनविरोध तर बाकी तीनही जागांसाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले, कामाशी जोडलेले व जनतेच्या प्रश्नांशी थेट संबंध असलेले हक्काचे उमेदवार दिल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचा हा निर्णय म्हणजे जनतेच्या अपेक्षांना दिलेले योग्य उत्तर असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून घरभेटी, पदयात्रा व थेट संवादाच्या माध्यमातून उमेदवारांना नागरिकांचे आशीर्वाद मिळत आहेत. प्रचारादरम्यान यापूर्वी प्रभागात झालेल्या विकासकामांचे नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, कचरा व्यवस्थापन तसेच दैनंदिन अडचणी व प्रलंबित तक्रारी नागरिक थेट उमेदवारांसमोर मांडताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० साठी आमदार अमित गोरखे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून विकासनिधीतून लहान मुलांसाठी सुरक्षित ‘मॅट प्ले-ग्राउंड’ उभारणीस मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये विशेष समाधान व्यक्त होत आहे. बालकांच्या सुरक्षित खेळासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे नागरिक सांगत आहेत.
“फक्त आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष काम” हीच भारतीय जनता पार्टीची ओळख असून, आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १० मध्ये विकासाची गती अधिक वेगाने वाढेल, असा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.






















Join Our Whatsapp Group