‘डोअर टू डोअर’ नागरिकांच्या गाठीभेटी
पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ११ कृष्णानगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, नेवाळेवस्ती, पूर्णानगर, शरदनगर, हरगुडेवस्ती, घरकुल योजना, अजंठानगर, दुर्गानगर मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. डोअर टू डोअर नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. महिला मंडळींकडून उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक संवादातून विश्वास, पाठिंबा आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे.

प्रभाग क्रमांक ११ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार मारुती गणपत जाधव (अ), ऍड. मयुरी निलेश साने (ब), सत्यभामा संजय नेवाळे (क), नारायण सदाशिव बहिरवाडे (ड) यांनी परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी साखर, पेढे भरवून आशीर्वाद दिले.उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन घड्याळाचे चिन्ह पोहचवून प्रचार केला. राष्ट्रवादीचे उमेदवारांनी प्रचारात आक्रमकपणे आघाडी घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास केला आहे. आता विकासाचा वेग आणखी वाढवण्यासाठी व झोपडपट्टी परिसरात, वस्तीवर विकास प्रकल्प राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे. आगामी काळात विविध योजना आणि प्रशिक्षण, प्रकल्पाचा लाभ तळागाळातील युवती, महिला भगिनींना मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही चारही उमेदवारांनी दिली. यावेळी उपस्थित असलेल्या मतदारांनी राष्ट्रवादी जिंदाबादच्या घोषणा दिल्या.






















Join Our Whatsapp Group