प्रभाग क्र.२१ मध्ये मतदारांच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com:- पिंपरी गाव वैभव नगर अशोक थिएटर प्रभाग क्र.२१ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने अक्षरशः वादळ उठवले असून, उमेदवारांना मतदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आठवले पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ. उषाताई संजोग वाघेरे, सौ. मोनिकाताई सुरेश निकाळजे, श्री. गणेश ढाकणे, श्री. नरेश पंजाबी यांनी पिंपरी कॅम्प, अयप्पा मंदिर परिसर, दुर्गा माता मंदिर परिसर, व वैष्णवी देवी मंदिर परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पिंपरीतील प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सर्वत्र विजयाचा सूर ऐकू येत आहे. प्रचाराच्या निमित्ताने भाजप उमेदवारांनी प्रभागातील पिंपरी कॅम्प, आयप्पा मंदिर परिसर, दुर्गा माता मंदिर परिसर, व वैष्णवी देवी मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन थेट संवाद साधला. या संवादातून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, त्यांच्या अपेक्षा तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या गरजा समजून घेतल्या.

प्रत्येक घरभेटीतून नागरिकांनी दाखवलेला विश्वास, आपुलकी आणि प्रेम हे भाजपच्या चारही उमेदवारांना मोठे बळ देणारे ठरत आहे. नागरिकांनी दिलेले आशीर्वाद, प्रोत्साहन आणि भक्कम पाठबळ यामुळे प्रभागाच्या विकासासाठी अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे उमेदवारांनी यावेळी सांगितले.
जनसंवादातून तयार होणारा हा सकारात्मक विश्वास येणाऱ्या काळात विकासाच्या नव्या वाटा उघडणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी नाते अधिक दृढ करत, सर्वांना सोबत घेऊन प्रगती व विकासाचा मार्ग पुढे नेण्याचा संकल्प यावेळी भाजपा उमेदवार सौ. उषाताई संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.
























Join Our Whatsapp Group