
पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व सेवाव्रती लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसेवा सप्ताहा अंतर्गत आकुर्डी येथील महापालिकेच्या ह.भ.प. कै. मल्हारराव कुटे रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

“प्रयास फाउंडेशन”च्या वतीने आयोजित या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आरोग्य शिबिरामध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणी तसेच गर्भाशय मुख कर्करोग तपासणी मोफत करण्यात आली. परिसरातील मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

यावेळी नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशालीताई काळभोर, नगरसेविका अरुणाताई लंगोटे, युवानेते विशाल काळभोर, गणेश लंगोटे, डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. हरिदास शेंडे, डॉ. धीरज तायडे, डॉ. दीपक चौधरी, फिजिशियन शाहीन खान, नारायण जायभाय यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या “जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा” या विचारातून प्रेरणा घेऊन हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





















Join Our Whatsapp Group