रहाटणी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काळेवाडी येथील तापकीर मळा येथे आज मंगळवार (दि.०६) सायंकाळी सात वाजता भव्य ‘विजयी निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख मार्गदर्शक ना. अजितदादा पवार उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

प्रभाग क्रमांक २७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. सुमित रघुनाथ डोळस, सौ. अश्विनी चंद्रकांत तापकीर, सौ. अनिता कैलासभाऊ थोपटे आणि श्री. सागर खंडूजी कोकणे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत निवडणुकीतील विजयासाठीचा निर्धार व्यक्त केला जाणार असून, पक्षाची भूमिका व विकासाचा अजेंडा मांडण्यात येणार आहे.

या विजयी निर्धार सभेला स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक, विविध आघाडीचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group