पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २२, २७ आणि २८ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली असून, राज्याच्या कॅबिनेट मंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजाताई मुंडे या सभेला प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ही भव्य जाहीर सभा आज शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सभेचे ठिकाण विमल गार्डन, रहाटणी, पिंपरी-चिंचवड असे आहे. या सभेत भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.
प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी मधील भाजपाचे उमेदवार विनोद नढे, नीता पाडाळे, कोमल काळे, हर्षद नढे प्रभाग क्रमांक २७ रहाटणी मधील भाजपा आरपीआय आठवले पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत नखाते बाबासाहेब त्रिभुवन सविता खुळे अर्चना तापकीर आणि प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर मधील उमेदवार शत्रुघ्न काटे, संदेश काटे, अनिता काटे, कुंदा भिसे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक २२, २७ आणि २८ मधील भाजप व आरपीआय (आठवले) गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराला या सभेमुळे मोठे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. विकासकामे, शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या आणि आगामी काळातील भाजपची दिशा यावर मा. पंकजाताई मुंडे मार्गदर्शन करणार आहेत. “विकास की बात | कमळ के साथ!” या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेली ही सभा पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वातावरणात महत्त्वाची ठरणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group