पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज (सोमवारी) सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. चिंचवड मोहननगर येथील श्री दत्त मंदिरासमोर ही जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची तोफ धडाडणार आहे.

उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना लोकांचा पाठिंबा वाढत आहे. प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, रांगोळाच्या पायघड्या घालून उमेदवारांचे स्वागत केले जात आहे.

या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभा घेतली. अजितदादांच्या सभेने आकुर्डीचे वातावरण घड्याळमय झाले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या प्रभागातील वातावरण पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमय झाले आहे. घड्याळ आणि तुतारी एकत्र आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. आकुर्डी भाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना मानणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास या पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन चारही उमेदवारांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group