भोसरी (Pclive7.com):-आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रोडशोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोला भोसरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पीएमटी चौक, भोसरी येथून या रोडशोची सुरुवात झाली. रोडशो दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक, भाजपा कार्यकर्ते तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. ढोल-ताशांचा गजर, घोषणा आणि उत्साही वातावरणात हा रोडशो पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
भाजपा कार्यकर्त्यांचा जोश आणि नागरिकांचा उत्साह पाहता संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. या रोडशोच्या माध्यमातून उसळलेली गर्दी ही येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयाची नांदी असल्याचा विश्वास उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या रोडशोमुळे भोसरी परिसरात राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत भाजपा महायुतीची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसून आले. प्रभाग क्रमांक ५ मधील भाजपचे उमेदवार अनुराधा गोफणे, सागर गवळी, कविता भोंगाळे आणि जालिंदर शिंदे तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाचे उमेदवार संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, राणीमाई पठारे, ॲड. नितीन लांडगे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहेत.






















Join Our Whatsapp Group