पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून विविध पक्षांचे कसलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत सर्वच उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शिवसेना पक्षाचे पिंपरी-चिंचवड येथील प्रभाग क्रमांक १५ ‘अ’ चे अधिकृत उमेदवार श्री. समीर जावळकर तसेच प्रभाग क्रमांक १५ ‘ड’ चे अधिकृत उमेदवार श्री. चेतन बेंद्रे यांनी संत ज्ञानेश्वर गार्डन परिसरातील माजी सैनिक संघटना कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी माजी सैनिकांशी सुसंवाद साधत देशाच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांप्रती आदर व्यक्त केला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

या भेटीदरम्यान दोन्ही उमेदवार सुशिक्षित व सुसंस्कृत असल्याने आगामी निवडणुकीत आपला पाठिंबा त्यांनाच राहील, असा विश्वास माजी सैनिकांनी व्यक्त केल्याचे समजते. याप्रसंगी सुभेदार महाडिक सर, कुलकर्णी सर, स्वामी सर, वाल्मीक बेंद्रे सर यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group