पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांनी आज सीएसटी ते पनवेल लोकल रेल्वेने प्रवास करून प्रवाशांसोबत तसेच कॉलेज तरुण-तरुणीं सोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मावळचा रणसंग्राम राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. पार्थ पवार हे पहिल्यांदाच राजकीय आखाड्यात उतरले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मावळच्या लढतीकडे लागले आहे. पार्थ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी एकजुटीने कामाला लागली आहे. तर स्वत: पार्थ पवार यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. विद्यार्थ्यांशी संवाद, रिक्षाने प्रवास, जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू असताना आज पार्थ यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला. सीएसटी ते पनवेल असा लोकलने प्रवास करून त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी कॉलेज तरुण-तरुणीं सोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले.





















Join Our Whatsapp Group