पुणे (Pclive7.com):- बारामती भाजपने जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. ते मतदानानंतर पत्रकारांशी बोलत होते. भाजपला बारामती जिंकता आली नाही तर त्यांनी निवृत्ती घ्यावी, असं आव्हान त्यांनी केलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यामध्ये रंगतदार लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात एकूण १४ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यावेळी १० विद्यामान खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
























Join Our Whatsapp Group