पुणे (Pclive7.com):- यंदा देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडत आहे. आज तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील १४ जागांसह देशातील ११५ जागांवर मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत पुण्यात १२.६६ टक्के तर बारामतीमध्ये १७.४६ टक्के एवढे मतदान झाले आहे. पुण्यात महायुतीकडून गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात लढत होत आहे. तर बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपाकडून कांचन कुल असा लक्षवेधी सामना रंगला आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
– सकाळी ११ पर्यंतची टक्केवारी –
पुणे लोकसभा एकूण :-१२.६६%
वडगाव शेरी – १०.८%
शिवाजीनगर – १२.२८%
कोथरूड – १७.५%
पर्वती – ११.२%
पुणे कँन्टोमेन्ट – १२.६%
कसबा पेठ – १२.३३%
—————————-
बारामती लोकसभा एकूण – १७.४६%
दौंड – २३.८९%
इंदापूर – ८.५४%
बारामती – २३.५%
पुरंदर – १७.५%
भोर – १२.४६%
खडकवासला – १८.५१%
























Join Our Whatsapp Group