पिंपरी (Pclive7.com):- माजी खासदार गजानन बाबर हे स्वगृही परतले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गजानन बाबर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काळेवाडी फाटा येथे आयोजित मेळाव्यात बाबर यांचा प्रवेश झाला. भगवा ध्वज व शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस 2014 मध्ये तिकीट कापल्यामुळे नाराज होऊन बाबर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. शिवसेनेत असताना त्यांनी तीन वेळा नगरसेवक दोन वेळा आमदार की तर एक वेळा खासदार किती पद त्यांनी भूषवले होते.
























Join Our Whatsapp Group