साहित्य:-
1 वाटी बारीक चिरलेला पालक
2 वाट्या बेसन
2 चमचे लसूण मिरची पेस्ट
1 चमचा ओवा
1/2 चमचा हळद
1 चमचा लाल तिखट
2 चमचे तेल
1 इनो पाकीट
अर्धे लिंबू
मीठ चवीनुसार
स्टीमर किंवा कढईत पाणी तापत ठेवावे आणि ज्या डब्यात आपल्याला वाफवायचे आहे त्याला तेल लावून ठेवावे.
कृती
इनो आणि लिंबू रस सोडून सगळे एकत्र करावे.
इडलीच्या पिठासारखे बॅटर पातळ असावे. नंतर त्यात इनो चे पाकीट फोडून सगळा इनो घालून त्यावर लिंबाचा रस पिळावा आणि झटपट मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून तेल लावलेल्या डब्यात ओतावे. थोडे टॅप करून लगेच वाफवायला ठेवावे. 20 ते 25 मिनिटे
नंतर सूरी च्या साहाय्याने बघावे खालपासून नीट शिजला आहे ना.
असेल तर गॅस बंद करून थोडा गार झाला की त्याच्या वड्या कापून घ्याव्यात.
एका पसरट पॅन मध्ये थोडे तेल घालून या वड्या चारही बाजूने खमंग कुरकुरीत फ्राय करून घ्याव्यात.























Join Our Whatsapp Group