पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १५ निगडी-प्राधिकरणातील भागात गेल्या काही दिवसापासून नियमितपणे कचरा उचलला जात नाही. रस्त्यांची साफसफाई केली जात नाही. प्राधिकरणात सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचलेले दिसत आहेत. घाणीचे साम्राज्य वाढले आहे. कचरा उचलणाऱ्या गाड्या येत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून येत्या दोन दिवसांत निगडी तसेच प्राधिकरणातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक अमित गावडे यांनी ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी आशा दुर्गुडे यांना दिला आहे.
याबाबत शिवसेनेच्या वतीने ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १५ मधील निगडी, प्राधिकरणातील कचरा गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे उचलला जात नाही. रस्त्याची साफसफाई केली जात नाही. प्राधिकरणात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले दिसत आहेत. घाणीचे साम्राज्य वाढले आहे. कचरा उचलणाऱ्या गाड्या नियमितपणे येत नाही. गाड्या येण्याची कोणतीही निश्चित वेळ नाही.
ऐन पावसाळ्यात स्त्यावर कचर्याचे ढिग साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डेंगू, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. कचऱ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस सुरू असल्यामुळे हा प्रश्न अत्यंत बिकट होत चालला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही पावले उचलली जात नाही. येत्या दोन दिवसात निगडी प्राधिकरण भागातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक अमित गावडे, शिवसेना उपशहरप्रमुख अमोल निकम, महिला विधानसभा संघटिका सरिता साने, विधानसभा समन्वय भाविक देशमुख, शाखाप्रमुख शरद जगदाळे, विभाग प्रमुख शैला निकम, कामिनी मिश्रा आदी शिवसैनिक उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group