पिंपरी (Pclive7.com):- विक्रमी ऊस उत्पादन घेतल्याबद्दल मावळ तालुक्यातील धामणे येथील प्रगतीशील शेतकरी व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांताराम दगडू गराडे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते काल विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे तसेच व्ही. एस.काळभोर आदी उपस्थित होते.
कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सर्वसाधारण सभेत गराडे यांचा गौरव करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेतून शहर अभियंता म्हणून निवृत्त झालेल्या गराडे शेतीवर लक्ष केंद्रीत केले असून पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी सुमारे १४ एकर जागेत तब्बल ९०० टन ऊसाचे उत्पादन घेऊन नवीन विक्रम नोंदवला. त्याबद्दल त्यांचे कृषी आणि सहकार क्षेत्रात कौतुक होत आहे.
























Join Our Whatsapp Group