पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. चिंचवड मधील विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीतून महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जगताप आणि लांडगे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित होती. मात्र पक्षाकडून औपचारिक घोषणा बाकी होती. आज भाजपकडून १२५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
चिंचवडमधून लक्ष्मण जगताप आणि भोसरीतून महेश लांडगेंना भाजपाची उमेदवारी जाहीर























Join Our Whatsapp Group