पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहनवाज शेख यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पिंपरीत नुकतेच भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी मेळाव्यास उपस्थित असंख्य महिलांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात भोसरी मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहनवाज शेख यांच्या प्रचाराला सुरूवात झाल्याचेही घोषित करण्यात आले.
अंजलीताई गायकवाड म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीची सत्ता जर महाराष्ट्र राज्यात आणायची असेल तर प्रत्येक महिलेने घराबाहेर पडून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार तसेच बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात पोहोचविण्याचे काम करावे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीला ४१ लाख मते मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीच्यावेळी ४१ लाखाचे ८२ लाख मते मिळायला हवी. याप्रमाणे आपण आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नियोजन करणे आवश्यक आहे असेही सांगितले.
या महिला मेळाव्यास असंख्य महिलांनी उपस्थिती दर्शविली. या मेळाव्यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार शहानवाज शेख यांनाही अंजलीताई आंबेडकर यांनी शुभेच्छा देऊन सर्व उपस्थित महिलांना शाहनवाज शेख यांना आमदार करावयाचे असल्याने आपण सर्व महिला संपूर्ण भोसरी मतदारसंघात तसेच पिंपरी चिंचवड मधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यास दिवस-रात्र एक करून प्रचारात सहभाग घेण्यासाठी नियोजन बद्दल प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला शहराध्यक्ष लताताई रोकडे, पुणे शहराध्यक्ष महिला आघाडी अनिता चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष महिला आघाडीच्या सीमाताई साईन, तसेच भीमाताई तुळवे, वंदनाताई सोनवणे, सरलाताई उपरवट, अंजली तायडे, रुहीनाझ शेख, उषाताई देश नेहरे, श्यामाताई जाधव, अंजनाताई कांबळे, मनीषा साळवे, शहनाज शेख, साधनाताई मेश्राम, यांच्यासोबत दीपक भालेराव, सनी गायकवाड, भारत कुंभारे, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group