पिंपरी (Pclive7.com):- गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले आहेत. त्यानुसार, देहूरोड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगाराला २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१) करण्यात आली आहे. सुरेश प्रेमचंद भिंगानीया (वय ३५, रा. वाल्मिकी मंदिराजवळ, देहूरोड) असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर निवडणुकीपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही सांगण्यात आले आहे. आरोपी सुरेश याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर यापूर्वी सीआरपीसी ११० अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेत परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी १ ऑक्टोबर रोजी सुरेश याच्या तडीपारीचे आदेश काढले. त्यानुसार त्याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group