पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करून रद्द केलेल्या सुलक्षणा शिलवंत-धर, मनसेचे किसन कांबळे, यांच्यासह पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. २९ उमेदवारांचे ४४ अर्ज वैद्य ठरले आहेत.
पिंपरी विधानसभा लढविण्यासाठी अंतिम मुदतीत तब्बल ३५ उमेदवारांनी ५१ अर्ज दाखल केले होते. या अर्जांची आज (शनिवारी) छाननी झाली. यामध्ये ३५ पैकी ५ उमेदवारांचे सहा अर्ज अवैद्य ठरले आहेत.यामध्ये राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळालेल्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचा समावेश आहे. त्यांना जाहीर झालेली उमेदवारी राष्ट्रवादीने अचानक रद्द करून माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली.
मात्र, बनसोडे यांनी शिलवंत यांच्या अगोदर उमेदवारी अर्ज भरल्याने बनसोडे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांनी ग्राह्य धरला आहे. शिलवंत यांच्यासह मनसेचे किसन शंकर कांबळे, जनहित पक्षाचे अशोक रामचंद्र आल्हाट, जनता पार्टीचे डॉ. अभिजीत भालशंकर, अपक्ष वैशाली बबन देठे यांचे सहा अर्ज अवैद्य ठरविण्यात आले आहेत.























Join Our Whatsapp Group