भोसरी (Pclive7.com):- भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी मोशी प्राधिकरण भागात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी विविध सोसायट्यांना भेटी दिल्या. नागरिकांनी आमदार लांडगे यांचे आकर्षक रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालून स्वागत केले. तसेच जोरदार घोषणाबाजी केली.

भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी मोशी प्राधिकरण भागातील जेंटल ब्रीझ सोसायटी, मधूबन सोसायटी, ओअॅसिस गॅलक्सी, शुभ आंगण, सिद्धी होम्स, द्वारका नगरी, ड्रीम नेस्ट, सुखवानी ओअॅसिस, गॅलक्सी अॅव्हन्यू, देव रेसिडेन्सी, रिच वूड्स, तुलसी लँडमार्क आदी सोसायट्यांना भेटी दिल्या. प्रत्येक सोसायटीमध्ये महेश लांडगे यांचे आकर्षक रांगोळ्या काढून फुलांच्या पायघड्या घालून स्वागत केले.

मोशी, प्राधिकरण भागातील कचरा, पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारखे मूलभूत प्रश्न आमदार महेश लांडगे यांनी मागील पाच वर्षात मार्गी लावले आहेत. प्राधिकरण बाधित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी वारंवार विधानसभेत आवाज उठवला आहे. यामुळे आमदार महेश लांडगे पुन्हा एकदा भोरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. परिसरातील नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group