पिंपरी (Pclive7.com):- श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ, गुरुमंदिर श्री बाळप्पा मठ आणि विश्व फाऊंडेशन शिवपूरी अक्कलकोट यांच्या वतीने शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2019 रोजी भव्य सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक सिद्धार्थ आपटे यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री नितीन वाटकर, विलास लांडगे, योगेश सासवडे, माधव खोत, मुकुंद चव्हाण, प्रदीप भालेकर आदी उपस्थित होते.
समन्वयक आपटे यांनी सांगितले की, गुरुमंदिर श्री बाळप्पा मठ आणि विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तमजी महाराज राजीमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली या सामुहिक अग्निहोत्राचे आयोजन शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2019 रोजी सायं. 5 ते 7 या वेळी भुजबळ चौक, रानजाई हॉटेलच्या मागे, वाकड, कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गालगत, पुणे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व जाती धर्मातील स्त्री, पुरुषांना मोफत सहभागी होता येणार आहे. सहभागी होणाऱ्या नागरिकांना अग्निहोत्र व ध्यानधारणा करण्याची संधी मिळणार आहे. तणावरहीत आरोग्यपूर्ण व आनंदी जीवनासाठी ऋषीप्रणित वेद प्रतिपादित अग्नीहोत्र उपासनेचा उद्देश परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांनी अक्कलकोटच्या अनादि अविच्छीन्न गुरुपीठावरून केला आहे. अनेक शास्त्रीय व वैज्ञानिक प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे की, नित्य नियमाने अग्नीहोत्र केल्यामुळे उत्तम आरोग्य, सकारात्मक दृष्टीकोन, जीवनातील ताणतणाव कमी होणे, पर्यावरणाचे संतुलन राखीत निर्जंतूक वातावरण निर्मिती व मुलांवर चांगले संस्कार होण्यास मदत होते. तसेच उत्तम सेंद्रीय शेतीसदेखील चालना मिळते. जगभरामध्ये 65 पेक्षा जास्त देशात आज अग्निहोत्राचे आचरण करते आहेत. संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास सहभागी होणा-या नागरिकांना मुक्त प्रवेश असून अग्निहोत्राचे साहित्य कार्यक्रम स्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहभागी होऊ इच्छिणा-या नागरिकांनी खालील दूरध्वनी क्रमांकावर आपले नाव, वय, पत्ता नोंदणी करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रम दिनांक : शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2019 रोजी सायं. 5 ते 7 या वेळेत.
कार्यक्रमाचे स्थळ : भुजबळ चौक, रानजाई हॉटेलच्या मागे, वाकड, कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गालगत, पुणे.
संपर्क : 7447489101 / 7447489103 / 7447489104
























Join Our Whatsapp Group