पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर आणि महापौर पदाच्या निवडणुका एकतर्फीच होणार हे जवळपास स्पष्ट होत. आणि निवडणुकीच्या आजच्या दिवशीही झालं तसंच.. महापौरपदी भाजपच्या माई ढोरे यांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर सहाजिकच उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतली. पण माघार घेत असतानाही त्यांनी केलेल्या विधानामुळे महापालिकेतील आजची निवडणूक ‘त्या’ एका वाक्यावर गाजली. अर्थात ‘ते’ वाक्य होतं “मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..!”
‘मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन’ हा नारा राज्यात सध्या चांगलाच गाजतोयं.. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विधानावरून सोशलमिडीयावर प्रचंड ‘ट्रोल’ करण्यात आले. आज पिंपरीत उपमहापौर पदाच्या निवडणुकीत देखील फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा पुनर्रोच्चार करण्यात आला. राष्ट्रवादीचे उमेदवार राजू बनसोडे यांना पक्षाने शेवटच्या क्षणी माघार घेण्यास सांगितले. त्यावेळी मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. असं म्हणत बनसोडे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान या निवडणुकीत भाजपाचे तुषार हिंगे बिनविरोध विजयी झाले. मात्र निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजू बनसोडे यांनी ‘मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..’ असे केलेलं विधान पालिका वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
























Join Our Whatsapp Group