पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी यासंदर्भातील आदेश आज दिले आहेत.

९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. तर २ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या त्यांच्या विनंतीवरून करण्यात आल्या आहेत. तर देवराम चव्हाण यांची वैद्यकीय कारणास्तव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांची निगडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) पदावर बदली करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षकांची बदली कुठून कुठे ते खालीलप्रमाणे
०१) शंकर श्रीरंग बाबर (पिंपरी पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा युनिट ३ व अतिरिक्त कार्यभार एमओबी)
०२) राजकुमार शिंदे (चिखली पोलीस स्टेशन ते वाहतूक शाखा)
०३) मिलिंद वाघमारे (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस स्टेशन)
०४) सतीश दत्तात्रय माने (वाकड पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)
०५) विवेक वसंतराव मुगळीकर (गुन्हे शाखा युनिट ३ ते वाकड पोलीस स्टेशन)
०६) राजेंद्र हिंदूराव राजमाने (गुन्हे वाकड पोलीस स्टेशन ते प्रभारी रावेत चौकी)
०७) गणेश साहेबराव जवादवाड (गुन्हे चिखली पोलीस स्टेशन ते निगडी पोलीस स्टेशन)
०८) राजेंद्र जयवंत निकाळजे (गुन्हे निगडी पोलीस स्टेशन ते गुन्हे पिंपरी पोलीस स्टेशन)
०९) शहाजी नारायण पवार (संगणक विभाग ते गुन्हे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन)
१०) अरुण रघुनाथ ओंबासे (भोसरी वाहतूक ते निगडी वाहतूक)
११) शिवाजी पर्बतराव गवारे (आळंदी वाहतूक ते भोसरी वाहतूक)
१२) देवराम चव्हाण (गुन्हे ते नियंत्रण कक्ष)
१३) सुनील जनार्दन टोणपे (निगडी पोलीस स्टेशन ते गुन्हे निगडी पोलीस स्टेशन)
























Join Our Whatsapp Group