पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना महापालिकेच्यावतीने मोफत धान्य देण्यात यावे. प्रत्येक नगरसदस्यांना त्यांच्या प्रभागात धान्य वाटप करण्याकरिता प्रत्येकी ५ लाखाचे धान्य खरेदी करून देण्यात यावे अशी सूचना महापौर माई ढोरे यांनी महापलिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
यासंदर्भात बोलताना महापौर माई ढोरे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांचे अन्नधान्य विना हाल होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधी करिता शहरातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत धान्य वाटप करणे आवश्यक आहे. संचारबंदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना रेशन दुकानावर तांदूळ गहू मिळत आहेत. परंतु वितरणातील अडचणींमुळे अनेक नागरिकांना एकवेळचे अन्न मिळवण्यात अडचण निर्माण होत आहे. गरीब व हातावर पोट असणारे नागरिक मदतीसाठी दारोदारी फिरत असून नगरसेवकांकडे देखील मोठ्या संख्येने येत आहेत. त्यावर सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी सभापती संतोष लोंढे, माजी पक्षनेते एकनाथ पवार आणि सर्व पक्षीय गटनेत्यांशी चर्चा केली असून महापालिकेच्या वतीने धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक नगरसदस्यांना त्यांच्या प्रभागात धान्य वाटप करण्याकरिता प्रत्येकी ५ लाखाचे धान्य खरेदी करून देण्यात यावे अशी सूचना महापौर माई ढोरे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.






















Join Our Whatsapp Group