पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी पुन्हा ‘नमो थाळी’ सुरू करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्या संकल्पनेतून हा लोकोपयोगी उपक्रम चालू करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा विस्तार कमी झाल्याने वायसीएम येथील नागरिकांची गर्दी कमी झाल्याने व बाहेरील सर्व सोयी उपलब्ध झाल्याने हा उपक्रम आपण बंद केला होता.
परंतु आता कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून पुन्हा नागरिकांचे जेवणाचे हाल होत असल्याने ही बाब लक्षात घेता हा उपक्रम तुषार हिंगे यांनी पुन्हा सुरू केला आहे. अत्यंत कमी दरांमध्ये पोटभर आणि चांगले जेवण नागरिकांना मिळावे ह्यासाठीचा हा उपक्रम आहे.
आज या उपक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पिंपरी चिंचवड भाजपाचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका सुजाता पालांडे, नगरसेवक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group