पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहिर करण्यात आलायं. या लॉकडाऊनमुळे पिंपरी चिंचवडमधील सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलीय. त्याअनुषंगाने श्री संत सेना महाराज प्रेरित जिवा महाला खानदेश नाभिक मंडळ पिंपरी चिंचवड पुणे व श्री संत सेना महाराज एकता नाभिक मंडळाचे काही ठराविक कार्यकर्त्यांनी एकत्र येवुन शहरातील ९० नाभिक कुटूंबांना मदतीचा हात दिला आहे.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटूंबाला ३ हजार रूपये किंमतीचे किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
या कोरोनाच्या महामारीमुळे सर्व नाभिक बंधूंचे कमवण्याच्या साधन असलेले सलुनची दुकाने बंद केली आहेत. त्यामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणुन जिवा महाला खानदेश नाभिक मंडळ व श्री संत सेना महाराज एकता नाभिक मंडळाच्या काही कार्यकर्ते एकत्र येवुन एक उपक्रम राबवला.
समाजातील ज्या बांधवांना कुठल्याही प्रकारची कमाई नाही, अशा समाज बांधवाला एक महिन्याचा किराणा द्यावा अशी संकल्पना मांडण्यात आली. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनाही आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला समाजातील दानशूर व्यक्तींनी खुप मोठा प्रतिसाद दिला. आणि एकुण ९० कुटुंबांसाठी ३ हजार रूपयांचे किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात यश आले.
या उपक्रमासाठी समाजातील अरविंद सैंदाणे, विलास महाले, रामदास सैंदाणे, रविंद्र फुलपगार, लोटन शिरसाठ, सुनिल पगारे, रामदास सैंदाणे (खेड) या सर्वांनी पुढाकार घेतला आणि उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनाही धन्यवाद देण्यात आले.