

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पिंपरी, चिंचवड, व भोसरी, या तिन्ही विधानसभेमध्ये एक निरिक्षक पाठवलेले असून उमेदवाराचा,व पक्षाचा अहवाल लवकरच ठाकरे यांना पाठवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे जे इच्छुक आहेत त्यांचा कार्य अहवाल लवकर सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. या तिन्ही विधानसभेमध्ये प्रामुख्याने पक्षाकडून इच्छुक उमेदवार असून तिन्ही विधानसभेमध्ये अन्य पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधलेला असून प्रामुख्याने चिंचवड व पिंपरी विधानसभेमध्ये माजी नगरसेवक व नगरसेविका लवकरच मनसेच्या उमेदवारी वरती उभे राहण्यासाठी पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत असून योग्य वेळी त्यांचे नाव जाहीर केले जाईल.
निवडून येण्याचा निकष व सर्वसामान्य नागरिकांमधील प्रतिमा यावरती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे काम तळागाळामध्ये पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी बैठकीमध्ये करण्यात आली. लवकरच तिन्ही विधानसभेमध्ये मेळावे पदाधिकारी, वेगवेगळे मार्गदर्शन शिबिर, तसेच मतदान नोंदणी राबवण्याचे नियोजन केले असल्याचे चिखले यांनी सांगितले.
या बैठकीत शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष अध्यक्ष बाळा दानवले, राजू साळवे, सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष दत्ता देवतारासे, भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर, महिला सेना शहराध्यक्ष सीमा बेलापूरकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अनिकेत प्रभू, तसेच सर्व मनसेचे पदाधिकारी या बैठकीला मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group