मोशी (Pclive7.com):- मोशी येथील स्पाईन सिटी चौकात रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक दुचाकींचे अपघात झाले आहेत. मुख्य चौकात हा खड्डा असून देखील महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

मोशी येथील स्पाईन सिटी चौकात मोठी वर्दळ असते. या चौकातून मोठ्या संख्येने वाहतूक होत असते. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यातच या मुख्य चौकात रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे मध्यभागी भला मोठा खड्डा निर्माण झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात झाले आहेत. तूर्तास परिसरातील काही जागरूक नागरिकांनी या खड्ड्यामध्ये झाडे लावून वाहन चालकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्य रस्त्यावर अशाप्रकारे पडलेल्या खड्ड्यामुळे एखादी मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी तातडीने या खड्ड्याची दुरुस्ती करावी. अन्यथा एखादी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Tags: खड्डा देत आहे अपघातांना आमंत्रणपिंपरी चिंचवड महापालिकामहापालिका प्रशासनाचे दुर्लक्षमोशीलोकप्रतिनिधीस्पाइन सिटी चौकस्पाईन सिटी चौक






















Join Our Whatsapp Group