पिंपरी (Pclive7.com):- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रजेच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवत न्याय, प्रशासन आणि सामाजिक सुधारणांना महत्त्व दिले, सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती आजही आदर्श मानली जाते. महिला नेतृत्व, लोककल्याण आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यामुळे त्यांच्या विचारांचे स्मरण करणे आणि त्यातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी, पिंपरी येथील स्मारकास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पडळकर, लक्ष्मण रुपनर, मुकुंद कुचेकर, दीपक भोजने, राहुल मदने, सोनाताई गडदे, भुजंग दुधाळे, माणिकराव बारगळ, शंकर दातीर, गणेश एकल, जयंत वायकुळे, रवींद्र कंकरे, सतीश खरात,वंदना धनगर आदी उपस्थित होते.
सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ह प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे,प्रभाग अधिकारी संतोष कोराड, अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष सचिन सरक, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गोफणे,अभिमन्यू गाडेकर, अजय दूधभाते, नवनाथ बीडे, छगन वाघमोडे, कृष्णराव गिरगुणे, संदिपान सामसे, रमेश गाढवे, गिरीश देवकाते, ज्ञानेश्वर मडबळ, प्राध्यापक गलांडे सर, बळीराम घोडके, महेंद्र लंबाते ,नारायण भुरे, वाघमारे सर, अक्षय तिघाडे, भास्कर गाडेकर, अरविंद टेकाळे, हरिश्चंद्र गायके उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे कर्तव्यनिष्ठा, न्यायप्रियता आणि लोकसेवेचे उत्तम उदाहरण आहे, राज्यकारभार करताना त्यांनी प्रजेच्या सुख-दुःखाला महत्त्व दिले. समाजातील विविध घटकांच्या हिताचा विचार करत त्यांनी विकासाची दृष्टी ठेवली. त्यांचे कार्य केवळ एका कालखंडापुरते मर्यादित नसून आजच्या व उद्याच्या पिढीसाठीही मार्गदर्शक आहे असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी बोलताना सांगितले.





















Join Our Whatsapp Group