पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील एका व्यावसायिकाला गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल एक कोटी ४३ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ही फसवणूक १० मार्च २०१७ ते ३० जून २०२४ या कालावधीत घडली. याप्रकरणी चंद्रशेखर किसन शिंदे (वय ४७ रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून मयत नरेंद्र रमेशचंद्र सेंगर व आकाश नरेंद्र सेंगर (दोघे रा. निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व त्यांच्या पत्नीला आरोपीने मीडिया आयडिया कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. यासाठी खोटी कागदपत्रे दाखवून फिर्यादीस कंपनीत ५३ लाख १७ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. यावेळी कोणताही परतावा न देता फिर्यादी यांची गुंतवणुकीची व परताव्याची मिळून १ कोटी ४३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.























Join Our Whatsapp Group