पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिखले यांच्या हस्ते आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निगडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिका, व्ही आर देअर व शांतीदूत परिवार यांच्यावतीने आज प्रभाग क्र.१३ मधील निगडी गावठाण एलिगंट सोसायटी याठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सचिन चिखले म्हणाले की, दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून जागतिक तापमानवाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वृक्ष संतुलन राखले जावे पर्यावरण जोपासले जावे. कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचं काय महत्व आहे, हे आता प्रत्येकाला पटलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज बनली आहे.
यावेळी माजी नगरसेविका अश्विनीताई चिखले, राजेंद्र कुटे साहेब, व सचिन चिखले यांचा सर्व मित्र परिवार उपस्थित होता.





















Join Our Whatsapp Group