पिंपरी (Pclive7.com):- मावळवासीय आणि पिंपरी चिंचवडकरांची तहाण भागविणारे पवना धरण आज ८५ टक्के भरलं आहे. त्यामुळे आज (दि.२९) रोजी दुपारी ४ वाजता धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात येणार असून पवना नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे यावर्षी लवकरच धरणाच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पवना धरणात सध्या ८५ टक्के पाणी साठा झालेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार धरणाच्या पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ हाेत आहे.
धरणामध्ये हाेणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन आज सायंकाळी ४ वाजता पाण्याचा विसर्ग साेडण्यात येणार आहे. तरी पवना धरणाच्या खालील बाजुस नदी तीरा कडील, सर्व गावातील नागरिकांनी दक्ष रहावे. नदी तीरावरील त्यांची सर्व जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. जेणे करून कुठलीही जिवित व वित्तहानी हाेणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
● पवना धरण अपडेट्स
▪सौजन्य – Pclive7.com▪पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज▪गुरूवार दि.२९ जुलै २०२१▪अपडेट्स सकाळी ६.०० वाजेपर्यंतचे▪२४ तासात झालेला पाऊस = १२ मि.मि.▪आज धरणातील पाणीसाठा = ८५.४५ टक्के▪२४ तासात पाणीसाठ्यात वाढ = १.४६ टक्के▪१ जूनपासून पाणीसाठ्यात वाढ = ५३.८६ टक्के▪१ जूनपासून झालेला पाऊस = १७१२ मि.मि.▪गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेले पाऊस = ५०२ मि.मि.▪गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणातील पाणीसाठा = ३४.४५ टक्के.





















Join Our Whatsapp Group