पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांच्या प्रयत्नांतून महापूरामध्ये बाधित झालेल्या कोकणातील महाड व चिपळूण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापुर येथे जीवनावश्यक वस्तूंच्या २६ गाड्या भरुन पाठवण्यात आल्या. आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी रात्री या गाड्यांचे पूजन करत पिंपरी चिंचवडकरांचे आभार मानले.
गेल्यावर्षी देखील महेश लांडगे यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरग्रस्तांचे अश्रू पुसले होते. एवढेच नाही तर स्वतः जावून त्या ठिकाणी थेट मदत नागरिकांपर्यंत पोहच केली होती. शेतकऱ्यांना आधार दिला होता. विद्यार्थांनी बळ दिले होते. त्यानंतर यावर्षी कोकणातील महाड व चिपळूण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापुर येथे आस्मानी संकट कोसळले. सर्व क्षणातच होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा प्राण गेला. अनेक कुटुंब उघड्यावर आले, शेकडो मुक्या प्राण्यांचा देखील जीव यामध्ये गेला.
या संकटातून सावरणे अतिशय अवघड आहे. परंतु एक छोटासा प्रयत्न म्हणून महेश लांडगे यांनी पुढाकार घेत पिंपरी चिंचवडकरांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी शक्य होईल ती मदत जमा केली. थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात, त्यानुसार तब्बल २६ गाड्या भरून जीवनावश्यक साहित्य जमा झाले. या गाड्या भरून सायंकाळी रवाना करण्यात आल्या. यामुळे पीडितांचे दुख कमी होऊ शकणार नाही. मात्र जगण्यासाठी आणि स्वत:ला सावरण्यासाठी हजारो नागरिकांना निश्चितच मदत होणार आहे.
महेश लांडगे यांच्याप्रमाणेच शहरातून अनेक संघटना, संस्था, पक्ष आणि वयक्तिक नागरिकांनी देखील जमेल ती मदत थेट पूरग्रस्तांना पोहचवली केली आहे. आणि अजूनही करत आहेत. त्यामुळे मदतीसाठी पिंपरी चिंचवडकर नेहमीच पुढे असतो हे पुन्हा एकदा नागरिकांनी दाखवून दिले आहे.
























Join Our Whatsapp Group