पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीयं. नुकताच पक्षाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने तरूणांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेत जाहिर प्रवेश केला असल्याची माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांनी दिली.
मनसे हा प्रस्थापितांचा पक्ष नसून विस्थापितांचा पक्ष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हणजे पक्षाचे आणि देशाचे भविष्य घडवणारी संस्था असून सत्तांतर घडवण्याची ताकद त्यांच्यात आहे. ही जाणीव पिंपरी चिंचवड मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात तरुणांना करून दिली. यावेळी शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसे प्रदेश उपाध्यक्ष गणेश आप्पा सातपुते, सरचिटणीस किशोर भाऊ शिंदे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिखले, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिन पवार, उपाध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, जनहित कक्ष शहर अध्यक्ष राजु भालेराव, महिला उपाध्यक्ष अनिता ताई पांचाळ, उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे, रोहित थरकुडे व विविध विंग चे अनेक पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी सेना उपाध्यक्ष अनिकेत प्रभु, सचिव अक्षय निळे, विभाग अध्यक्ष प्रतिक शिंदे, संघटिका श्रध्दा देशमुख, विभाग अध्यक्ष विकास कदम, उपविभाग अध्यक्ष सुमित कलापुरे, संघटक विक्रम आडे, आकाश पांचाळ, शंतनु तेलंग, गणेश गायकवाड, अक्षय खामकर, रूपेश पाटसकर, परमेश्वर त्रिमले, सोमनाथ स्वामी, देवेंद्र निकम, हर्षल कोळेकर, ओम गायकवाड या पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.