पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेने ओपन जिमसाठीच्या साहित्य खरेदीकरिता प्रसिद्ध केलेल्या ई-निविदेतील स्पेसिफिकेश कालबाह्य झालेले आहे. निविदेतील स्पेसिफिकेशनमध्ये काळानुरुप बदल करण्यात यावा. जेणेकरुन ओपन जिम साहित्य हे दर्जेदार खरेदी करणे सोयीचे होईल. त्यामुळे प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात मिसाळ यांनी म्हटले आहे की, महापालिकेने ई-निविदा प्रकाशित केली आहे. या ई – निविदा दस्त ऐवजाचे अवलोकन केले असता ज्या ओपन जिम साहित्याचे दर करार करुन साहित्य खरेदी करावयाची आहे.
याबाबतचे निविदेत नमूद केलेले स्पेसिफिकेश हे कालबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच प्रचलित, अत्याधुनिक स्पेशिफिकेशनचे आर्टीफिशियल वूड याप्रकारचे ओपन जिम साहित्य सद्यस्थितीत महाराष्ट्रातील जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, पुणे, नागपूर चंद्रपूर व इतर विविध जिल्ह्याठिकाणी बसवणेत आलेले आहेत.
आर्टिफिशियल वूड याप्रकारचे साहित्याचे गुणवत्ता व दर्जा उत्कृष्ट असून दिर्घकालावधी करिता उपयोगात येईल. याबाबत अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तथापी महाराष्ट्र राज्यातील क्रिडा संचालनालय पुणे यांनी ओपन जिम साहित्याचे स्पेशिफिकेसनला तांत्रिकदृष्टया मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार सदर स्पेसिफिकेशननुसार क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य खरेदी प्रक्रिया राबवित आहे.
त्यामुळे महापालिकेमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ई- निविदेतील स्पेसिफिकेशनमध्ये काळानुरुप बदल करण्यात यावा. जेणेकरुन ओपन जिम साहित्य हे दर्जेदार खरेदी करने सोयीचे होईल. तसेच भविष्यातील देखभाल खर्चात सुद्धा बचत होवू शकेल. त्यामुळे प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करण्यात यावी.























Join Our Whatsapp Group