पिंपरी (Pclive7.com):- भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका, महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती आणि माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी शुक्रवारी घरवापसी केली आहे.
पुण्यात झालेल्या प्रवेशावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी पिंपरी चिंचवड विभागाचे माजी अध्यक्ष विजय आण्णा जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे उपस्थित होते. महापालिकेची आगामी निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरे सुरु झाली आहेत.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून राजू लोखंडे यांची ओळख आहे. २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्यापूर्वी शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणूनही त्यांनी केले.
२०१७ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी चंदा लोखंडे या पिंपळेगुरव, वैदूवस्तीमधून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या. सध्या त्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आहेत. राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधत भाजपला धक्का दिला.
























Join Our Whatsapp Group