पिंपरी (Pclive7.com):- क्रिकेट मॅच हरल्याने दोघांनी मिळून विजेत्या संघाच्या एका खेळाडूला बॅटने बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. ९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास टेल्को ग्राउंडशेजारी, पिंपरी येथे घडला. सलमान शेख (३०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), समीर पठाण (वय २८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुमीत सुधाकर शेट्टी (२१, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्या संघात क्रिकेटचा सामना झाला. यामध्ये फिर्यादीची टीम विजयी झाली.
त्यामुळे विजयी टीम जल्लोष करत असताना आरोपी सलमान शेख बॅट घेऊन धावत शिवीगाळ करीत फिर्यादी यांच्याकडे आला. ‘तू व तुझ्या क्रिकेट टीमने विजय मिळवून खेळ दाखवला आहे. मी पण आताच जामिनावर सुटून आलो आहे. मला दुसरा पण खेळ खेळता येतो. तुला दुसरा खेळ दाखवू काय’, असे म्हणून सलमान शेख याने फिर्यादी यांच्या डोक्यात बॅटने मारहाण केली.
त्यासोबतच आरोपी समीर पठाण यानेही फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. आरोपींच्या इतर साथीदारांनी देखील फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. पिंपरी पोलीस करीत आहेत.

























Join Our Whatsapp Group