पिंपरी (Pclive7.com):- मागील सलग चार वर्षे स्वच्छ सर्वेक्षणात पिछाडीवर जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची यावर्षी सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० मध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा देशात १९ वा, तर राज्यात पिंपरी-चिंचवड शहर टॉप १० मध्ये आले असून पाचवा क्रमांक आला आहे.
स्वच्छ भारत सर्वेक्षणाचा शनिवारी (दि.२०) निकाल जाहीर झाला आहे. मागील वर्षी पिंपरी-चिंचवडचा देशात २४, तर राज्यात सातवा क्रमांक आला होता. केंद्र सरकारने दोन वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केले होते. स्वच्छ सर्वेक्षण वर्षातून एकाचवेळी करण्याचे बंद केले.
त्याऐवजी तीन टप्प्यात सर्वेक्षण केले जाते. पहिल्या टप्प्यापासूनच सर्वेक्षणात शहराची यावर्षी देखील चांगली सुधारणा होती. आता या स्वच्छ सर्वेक्षणाचा अंतिम निकाल लागला आहे. त्यामध्ये शहरात मोठी सुधारणा झाली असून यावर्षी १९ वा, तर राज्यात पाचवा क्रमांक आला आहे.
दरम्यान, २०१६ मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहर देशात टॉप १० मध्ये होते. शहराचा ९ वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून एक नंबर आला होता. परंतु, त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. देशात नवव्या क्रमांकावर असलेले पिंपरी-चिंचवड शहर २०१७ मध्ये थेट ७२ व्या नंबरवर फेकले गेले होते. २०१८ मध्ये देशात ४३ वा, तर, राज्यात सहावा क्रमांक होता. २०१९ मध्ये पुन्हा घसरण होऊन देशात ५२ वा, तर राज्यात १३ वा क्रमांक आला होता.
मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये या मानाकंनात काही प्रमाणात सुधारणा झाली होती. गेल्या वर्षी शहराचा देशात २४ वा तर राज्यात सातवा क्रमांक आला होता. त्यामध्ये यावर्षी आणखी सुधारण होऊन देशामध्ये शहराने १९ वा क्रमांक मिळवला आहे. तर राज्यामध्ये टॉप टेनमध्ये पुन्हा स्थान मिळवत पाचवा क्रमांक मिळवला आहे.

























Join Our Whatsapp Group