पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ३० फुगेवाडी-दापोडी-कासारवाडी मधील नागरिकांसाठी, ई-श्रम कार्ड, हेल्थ कार्ड, युनिवर्सल पास या अभियानाचे आयोजन पिंपरी युवा सेनेतर्फे करण्यात आले आहे.
ई-श्रम कार्ड हे असंघटित कामगारांसाठी आहे. तसेच हेल्थ कार्ड या सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. ज्या नागरिकांनी करोना प्रतिबंधाचे दोन डोस घेतलेले असेल त्या नागरिकांसाठी युनिवर्सल पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या अभियानाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक रामभाऊ शिंगोटे, शिवा भाऊ काची, प्रताप शिरसे शेट्टी, अनिल साठे, अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तरी या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान पिंपरी युवा सेनेचे युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले. अधिक माहितीसाठी निलेश हाके जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

























Join Our Whatsapp Group