पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान होणार असून त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ ही मान्यताप्राप्त संघटना आहे. या संघटनेत ६ हजार २०० सभासद आहेत. कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकारणीची सन २०२२ ते २०२४ या दोन वर्षाच्या कालावधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. उमेदवारी अर्जही दाखल झाले होते. परंतु, शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत होती. तिस-या लाटेत प्रचंड रुग्ण वाढत होते. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

आता शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १० ते ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र मागे घेता येतील. ११ फेब्रुवारी रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल.

१४ फेब्रुवारी रोजी पॅनल प्रमुखाची निवड व चिन्ह वाटप करण्यात येईल. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महापालिका मुख्य इमारतीत मतदान होईल. त्याचदिवशी मतदान झाल्यानंतर मतमोजणी होणार आहे.























Join Our Whatsapp Group