पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणी सदस्य आणि इतर पदाधिकारींच्या झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे प्रमुख शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांनी अवघ्या 9 मतांच्या फरकाने निसटता विजय मिळवला. झिंजुर्डे यांना एकूण 2534 मते मिळाली
तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना 2525 मते मिळाली.
25 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी मतदान झाले. यानंतर सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मतमोजणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे अध्यक्ष पदासह इतर नऊ पदाधिकारी निवडून आले.
तर कार्यकारणी सदस्य पदासाठी एकूण पंधरा जागांपैकी दहा उमेदवार निवडून आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 25 पैकी 19 उमेदवार निवडून आले.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे उपाध्यक्षपदासाठी मनोज माछरे यांना 2682, महादेव धोत्रे यांना 2608 मते तर तर आपला महासंघ पॅनलच्या उमेदवार सुप्रिया सुरगुडे यांना 2616 मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी अभिमान भोसले यांना 2683, चिटणीस पदासाठी मंगेश कलापुरे यांना 2615, सहसचिव पदासाठी उमेश बांदल यांना 2665, कोषापाल पदासाठी नितीन समगिर यांना 2640, संघटक पदासाठी शुभांगी चव्हाण यांना 2702, मुख्य संघटक पदासाठी दिगंबर चिंचवडे यांना 2615 मते मिळाली.