पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीने वृक्षारोपण, स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पुणे -पंढरपूर- पुणे सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी ही वारी १८ जून आणि १९ जून या दोन दिवसात संपन्न होणार आहे. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये एकादशी निमित्त रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. याप्रसंगी मंदिराचे प्रमुख विश्वस्त गोपाळ कुटे, पोलीस अधिकारी अजय दरेकर, वनविभागातील आयएफएस अधिकारी नानासाहेब लडकत, उद्योजक अण्णा बिरादर, इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे गणेश भुजबळ, अजित पाटील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

सदर वारीचे ७ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व १ हजाराहून अधिक सभासद एका दिवसात देहू ते पंढरपूर असे दोनशे पन्नास किलोमीटरचे अंतर १८ जून रोजी पार करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर ते आळंदी अशी परतीची वारी करणार आहेत असे संस्थेचे सदस्य गजानन खैरे यांनी माहिती दिली. अशोक महाजन यांच्या तर्फे संस्थेला पंढरपूर वारीसाठी दहा हजार रुपयाची देणगी देण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे कार्यकारी सदस्य प्रा. योगेश तावरे, गिरीराज उमरीकर, नितीन पवार, प्रज्ञा अजगर, सोनल वामन, रमेश माने, तन्मय माने, कविता कोल्हे, दत्तात्रय कुलकर्णी, अमित पवार, कपिल पाटील, स्वामिनाथन श्रीनिवासन, जनार्धन कात्तुल, प्रीथी नारायणन, भूषण तारक, अजित गोरे, राहुल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
या वारीत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी www.Indoathleticsociety.com या स्थळावर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group