वडगाव मावळ (Pclive7.com):- देहू नगरपंचायतमध्ये एकमेव असलेल्या भाजपच्या नगरसेविका पूजा काळोखे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत हाती घड्याळ बांधले आहे. त्यामुळे देहू नगरपंचायत मध्ये भाजपचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

या पक्ष प्रवेशामुळे मावळ भाजपला मोठा धक्का बसला आहे. शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुरुवारी सर्व सेलची आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी भाजप नगरसेविका पूजा काळोखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला अध्यक्ष दिपाली गराडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष पुष्पा घोजगे, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी नगरसेवक गणेश काकडे, कांतीलाल काळोखे, तसेच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, देहू नगरपंचायतचे नगरसेवक, आदी मान्यवर उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group