पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्यावतीने गेल्या सात वर्षांपासून वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात पुरूषांनी वटसावित्री साजरी करण्याचा पहिला उपक्रम राबणारी ही संस्था आहे. यावेळी पुरुषांनीही वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करीत, जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून फेऱ्या मारल्या.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे अध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले, पत्नी व पती यांना समान कायद्याने अधिकार दिले आहेत. पुरुषप्रधान देशात महिला पण पुरूषांच्या खांद्याला खांदा देऊन खुरपणीपासून ते नासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे पुरुषानेही जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी आणि पत्नीला दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून वटवृक्षाची सात फेरे मारून वटपौर्णिमा साजरी केली तर वावगे ठरू नये.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पिंपरी चिंचवड महिलाध्यक्षा मीना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, गुणवंत कामगार काळूराम लांडगे, कार्याध्यक्ष गजानन धाराशिवकर, सुरेश कंक, प्रकाश बंडेवार, राजेंद्र गोराने, आरोग्य निरीक्षक उद्धव ढवरी, विजय कांबळे, लक्ष्मण जोगदंड, भरत शिंदे, प्रदिप बोरसे, अरविंद मांगले, जालिंदर दाते, शंकर नाणेकर, दत्तात्रेय अवसरकर, वसंत चकटे, विकास कोरे आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group