पिंपरी (Pclive7.com):- बेळगांव (कर्नाटक) येथील शिवगंगा स्केटिंग क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या ९६ तासांच्या विश्व विक्रम महोत्सवात वाकड ताथवडे- पिंपळे सौदागर येथील ए.आय.एस. ड्रीम्स स्केटिंग क्लबच्या स्केटर्सने नवा विक्रम केला.

बेळगांव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगांव दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने या विश्वविक्रमाचे आयोजन केले होते. वाकड ताथवडे येथील ड्रीम्स स्केटिंग क्लबचे अश्विनी इंटरनॅशनल स्कूलचे क्लबचे ३ खेळाडूंनी सहभागी होवून यश संपादन केले. शिवगंगा रोलर स्केटींग रिकवर गिनीज बुकमध्ये नोंद होण्यासाठी ९६ तासांचे लार्जेस्ट स्केट मोटो फॉर्मेशन स्केटींग भाग घेवून तो रेकॉर्ड ॲटेम्ट पूर्ण केला.

ड्रीम्सचे खेळाडू गार्गी नढे (वय५), माही मंगनाणी (८), ऋतूजा पाटील (वय ११) यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून महाराष्ट्राचे नाव उंचावले. संपूर्ण देशभरातील सुमारे पाचशे खेळाडू सहभागी झाले होते. यामधून गार्गी हि सर्वांत अल्पवयीन खेळाडू ठरली. हे तिन्ही खेळाडू सप्टेंबर महिन्यात इंडोनेशिया येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅंपियनशिप मध्ये सहभागी होणार आहे. यासाठी स्पोर्टस् एलयुपी तर्फे प्रायोजकत्व प्राप्त झाले आहे. ड्रीम्स क्लबच्या वाकड ताथवडे, पिंपळे सौदागर येथील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर २२ पदके प्राप्त करून देशाचे नाव उंचावले आहे.
तसेच मागील आठवड्यात पिंपळे सौदागर येथे पार पडलेल्या नाना काटे स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे आयोजित दहा दिवसीय स्पोर्ट्स कार्निवल मध्ये ए.आय.एस ड्रीम स्केटिंग क्लबचा ताथवडे वाकड व पिंपळे सौदागर येथील स्केटर्स १५ सुवर्ण, १५ रजत, व अकरा कांस्य पदके मिळवून पिंपरी-चिंचवडमध्ये क्लब चे नाव मोठे केले व सर्वात जास्त मेडल मिळवून क्लब पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला. यासाठी प्रशिक्षक वैभव बिळगी, राहुल बिळगी, वंदना बिळगी, चिंतामण राऊत, सुरज दीक्षित, रिषभ गावंडे यांचे मार्गदर्शन लाभले.





















Join Our Whatsapp Group