मावळ (Pclive7.com):- पवन मावळातील डोणे येथे एकता प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हर घर तिरंगा अंतर्गत घरोघरी तिरंगा मेहिमेअंतर्गत स्वातंत्र्य भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ कुटुंबांना भारताच्या राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या निमित्ताने हर घर तिरंगा अंतर्गत दि.१३ ते १५ आॅगस्ट २०२२ या दिवशी देशातील प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. आपला राष्ट्रध्वज तिरंगा आपला अभिमान अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होवू नये यासाठी घरोघरी तिरंगा ध्वज वाटप करताना एकता प्रतिष्ठाण डोणे या सामाजिक संस्थेच्या वतीने जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी एकता प्रतिष्ठाणचे संस्थापक बाळासाहेब घारे, अध्यक्ष योगेश कारके उपाध्यक्ष रवींद्र काळभोर, पोलिस पाटील उमेश घारे कार्याध्यक्ष विशाल कारके, किरण काळभोर, विजय कारके, नागेश कारके, शेखर काळभोर, समिर खिलारे, सागर चांदेकर, तेजस घारे, प्रतिष्ठाणचे सभासद व महिला उपस्थित होत्या.
Tags: हर घर तिरंगा
























Join Our Whatsapp Group