पिंपरी (Pclive7.com):- गुंतविलेल्या रकमेवर दाम दुप्पट देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची पावणे दोन कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक व एजंट अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून पिंपरी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, कंपनीचे संचालक कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले आहेत. हा प्रकार चिंचवड येथे घडला.

रवींद्र मुरलीधर हगवणे (रा. इंद्रायणी पार्क, नंदनवन सोसायटी, मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जेसीबी कॅपिटल प्रा. लिमिटेड कंपनीतर्फे संचालक राहुल गुलाबसिंग जाखड, रामहरी ज्ञानदेव मुंढे, सुनील जनार्दन झांबरे, एजंट माधव रघुनाथ चासकर, विश्वास रामचंद्र भोर, मुख्य एजंट नवनाथ एकनाथ रेपाळे (ऑफिस पत्ता बी झोन, मुंबई-पुणे रोड, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
डिसेंबर २०१९ ते अद्यापपर्यंतच्या कालावधीत कंपनीचे संचालक व एजंट यांनी संगनमत केले. आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने दहा महिन्यात दरमहा दहा टक्के परतावा देण्याच्या योजनेत व सहा महिन्यात दाम दुप्पट मुदत ठेवीच्या योजनेत परतावा देण्याचे फिर्यादीना आमिष दाखवले. फिर्यादीसह त्यांच्या पत्नीकडून गुंतवणुकीपोटी साडे सात लाख रुपये घेतले. या योजनांची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर फिर्यादीचे मूळ साडे सात लाख व त्यावरील उर्वरित अधिक परतावा चार लाख ९७ हजार अशी एकूण १२ लाख ३१ हजार ६०० रुपयांची फसवणूक केली.
























Join Our Whatsapp Group